पंढरपूर : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या प्रथेप्रमाणे आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली. त्यावेळी मंदिरात भाविक उपस्थित होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीचं महापूजा होती. कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांनी विठुरायाची महापूजा केली. आजची महापूजा करण्यासाठी निवडणूक आयोगाने काही अटी आणि शर्तीच्या आधारावरती परवानगी दिली आहे. पंढरपूरात दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. त्यानंतर त्यांनी पहाटे महापूजा केली. आषाढी एकादशीनिमित्त श्री. शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
#आषाढि_एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री @mieknathshinde व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड यांच्या हस्ते संपन्न.@MahaDGIPR @CMOMaharashtra pic.twitter.com/RAVqOFc3Fd
हे सुद्धा वाचा— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) July 9, 2022
वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो. मला आज पुजा करण्याचा मला मान मिळाला. आमच्या चार पिढ्याने पुजा केली हे भाग्य सर्वांना मिळावं. पूर येऊ नये पण बळीराजा सुखी राहू दे. बळीराज्याचे संकट दूर होऊ द्या, कोरोनाचा नायानाट होऊ द्या, असं साखडं पांडूरंगाला घातल आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीडियाशी बोलताना सांगितलं. समाजातील सर्व लोकांसाठी हे राज्य असेल. पंतप्रधानांनी सांगितले राज्यात मोठे प्रकल्प उभे करा. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, आषाढी वारीचा आढावा घेतला लॉग टर्मसाठी सुधारणा व्हावी. ह्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या. कायमस्वरूपी विकास करण्याच्या सुचना दिल्या आहे असंही शिंदे यांनी सांगितलं.
काही जिल्ह्यात अतिवृषी झाली आहे. पूर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी मनुष्यबळ लागते. पावसाळ्यानंतर ह्या निवडणुका घ्या अशी विनंती करणार आहे. न्याय व्यवस्था हे ओबीसीला आरक्षण मिळणार आहे. आम्ही राज्य स्थापन केले आहे. कायद्यानूसार आम्ही राज्य स्थापन केले आहे. हे सरकार हे कायदेशीर आहे. हे राज्य सर्वसामन्याचे राज्य आहे. सर्वांना न्याय मिळणार आहे. जागेवर काम होईल अशी आमची इच्छा आहे. भाजपा नेत्यांची नाही तर संविधानिक पदावर असेल्या व्यक्तींची भेट घेतली. राज्याच्या विकासात केंद्रांची मदत होईल यासाठी दिल्लीत बैठक घेतली असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील असेही त्यांनी सांगितले.
राज्यात यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी ‘ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.
प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.
यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, संजय(बंडू) जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादाजी भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रवींद्र फाटक, राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकरी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.