नाशिकच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सीईओ “आशिमा मित्तल” कोण आहे ?

| Updated on: Sep 30, 2022 | 1:54 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नाशिकच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल कोण आहे ?
Image Credit source: Twitter
Follow us on

नाशिक : शिंदे सरकारने (Eknath shinde) राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS) केल्या आहेत. त्यामध्ये नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लीना बनसोड यांची बदली झाली असून आता आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारनार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहेत. तर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी असलेल्या आशिमा मित्तल यांची नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीतील आशिमा मित्तल ह्या एक अधिकारी आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या बदल्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद करूनच बदल्या केल्याचे बोलले जात असून शिंदेंचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे.

त्यातच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त केलेल्या आशिमा मित्तल या तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीतील आहेत.

या नियुक्तीमधील एक बाब अशी आहे की, यापूर्वी देखील महिलाच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होत्या आणि आताही आशिमा मित्तल यांच्या रूपाने महिला मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे.

आशिमा मित्तल या मूळच्या राजस्थान राज्यातील असून जयपूर मधील आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहे.

सिव्हिल इंजिनियर झालेल्या आशिमा मित्तल यांनी त्या क्षेत्रात कामही केले असून 2018 साली त्या आयएएस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात रुजू झाल्या होत्या.

तर त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे मानववंशशास्र या विषयात झाले आहे. 2018 पासून त्या महाराष्ट्रातील शासकीय सेवेत रुजू असून आता नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे.