अहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’; संभाजीनगरचा विषय येताच साष्टांग दंडवत; भाजपचा हल्लाबोल

| Updated on: Jan 17, 2021 | 12:02 PM

औरंगाबादच्या नामकरणाचा, राज्याच्या अस्मितेचा विषय येताच शिवसेनेकडून काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत घातला जातो, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला. (Ashish shelar shiv sena Sanjay Raut)

अहंकाराचा विषय येतो तेव्हा उखाड दिया; संभाजीनगरचा विषय येताच साष्टांग दंडवत; भाजपचा हल्लाबोल
आशिष शेलार
Follow us on

मुंबई : स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा शिवसेनेकडून ‘उखाड दिया’ची भाषा केली जाते. पण औरंगाबादच्या नामकरणाचा, राज्याच्या अस्मितेचा विषय येताच शिवसेनेकडून काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत घातला जातो, असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला. तसेच शिवसेना पक्ष सत्तेसाठी एवढा लाचार का झाला आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. (Ashish shelar criticizes shiv sena and Sanjay Raut on Sambhaji nagar issue)

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखटोक या सदरामध्ये औरंगाबद शहराच्या नामकरणाविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी औरंगजेब कधीच सेक्यूलर नव्हता असे म्हणत आधी इतिहास वाचण्याचा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. त्यानंतर शेलार यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीका केली.

“स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा केली जाते. मात्र आता संभाजीनगरचा आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत” घातला जात आहे. शिवसनेचा पक्ष सत्तेसाठी एवढा लाचार झाला आहे का?,” असं आषिश शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

सामनामधून काँग्रेसवर टीका

सध्या औरंगाबादच्या नामकरणाचा विषय चांगलाच तापला आहे. संजय राऊत यांनी नामांतराच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका राऊतांनी रोखठोक या सदरातून केलीये.

हिंदुस्थानची घटना सेक्युलर आहेत. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा हिंदूंचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्या? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला आहे. यापूर्वी शिवसेनेचे नेते अरविंद सावत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना विचारला होता.

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे ‘नमस्ते संभाजीनगर’

“कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का???” सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका

(Ashish shelar criticizes shiv sena and Sanjay Raut on Sambhaji nagar issue)