मुंबई-भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही आजच्या निवडणूक निकालावर (Elections Result 2022) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आज पाच राज्यातल्या निवडणूक निकालात 4 राज्यात भाजपला सत्ता मिळाली आहे. काँग्रेसच्या हाती भोपळा लागला आहे. त्यामुळे राज्यातले भाजप नेते आता महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) राज्यात खुलं आव्हान देत आहेत. ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे म्हणताना राज्यातले नेते दिसून येत आहेत. आशिष शेलार यांनी यावर बोलताना, हा विजय आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाला आहे. राज्यातील सत्ता बदलावर मी बोलणार नाही, मात्र त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील बोलतील, असे शेलार म्हणालेत त्याचबोरबर नक्कीच मुंबई महानगरपालिकेवर देखील सत्ता बदल होणार आणि भाजपची निर्विवादपणे सत्ता येणार असा दावाही शेलार यांनी केला आहे.
राऊत-शेलार पुन्हा आमनेसामने
तसेच संजय राऊतांवर बोलताना, संजय राऊत यांनी आज कबुल केलं आहे की निवडणुकीमध्ये त्यांनी नोटांचा वापर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे. ज्या गोव्यात काहीतरी हाती लागेल अशी अशा शिवसेनेला होती, मात्र तिथेही त्यांची भलतीच निराशा झाली आहे. त्यामुळे भाजप त्याच जखमेवर मीठ चोळत आहे. . राऊत यावेळी म्हणाले, त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळाले आहे. विजय पचवायला शिकलं पाहिजे अजीर्ण झालं की त्रास होतो. सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीनं राज्य करायला शिकलं पाहिजे, असं राऊत म्हणालेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्येही भाजपची आघाडी आहे. भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी काँग्रेसचेही कान टोचले आहे. त्यावरूनच आता आशिष शेलार यांनी राऊतंना टोला लगावला आहे.
महाराष्ट्र अभी बाकी है-गिरीश महाजन
महाराष्ट्रात एकहाती सत्ता भाजपची येईल, आमच्यासोबत दगाफटका केला, आमचं आव्हान आहे की शिवसेनेनं दोन लोकसभेच्या 2 जागा निवडून आणून दाखवाव्या, असे खुले आव्हान या निकालानंतर गिरीश महाजन यांनी दिले आहे. “ही तर फक्त झांकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे… निवडणुका बाकी आहेत यांचे डब्बे गूल होणार…“ असेही महाजन म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेची जी अवस्था आहे, ती येत्या काळात खूप वाईट होणार आहे, त्यासाठी त्यांनी तयार रहावं, असा इशारा भाजपने दिला आहे. तर संजय राऊतांवर बोलताना, त्यांना काही म्हणू द्या, संजय राऊत यांनी कमी बोलावं काम जास्त करावं, त्यांच्या जास्त बोलण्याने सेना हरली, असेही महाजन म्हणाले.
ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे न्यायालयात विधिमंडळाचे दिवाळे निघाले, शेलार पुन्हा कडाडले