रामदास आठवलेंचा हुकमी एक्का उद्धव ठाकरेंच्या गटात, मातोश्रीवर बांधले शिवबंधन

| Updated on: Oct 15, 2022 | 1:25 PM

अहमदनगर येथील अशोक गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधले आहे.

रामदास आठवलेंचा हुकमी एक्का उद्धव ठाकरेंच्या गटात, मातोश्रीवर बांधले शिवबंधन
Image Credit source: TV9 Network
Follow us on

कुणाल जायकर, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडल्यानंतर शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे (Uddhav Thackeray) गटात इनकमिंग सुरूच आहेत. नुकतेच आठवले गटाचे माजी प्रदेश सचिव यांनी रामदास आठवले यांना जयभीम करत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत जय महाराष्ट्र केला आहे. अशोक गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले आहे. यावेळी अशोक गायकवाड यांच्या सोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला आहे. अशोक गायकवाड हे आंबेडकरी चळवळीचे आणि बहुजन चळवळीतील जेष्ठ नेते आहेत. अशोक गायकवाड हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. कधीकाळी आठवले यांचे विश्वासू म्हणून गायकवाड यांची ओळख होती. चळवळीतील नेतृत्व असल्याने गायकवाड यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे आठवले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून ठाकरेंना याचा फायदा होणार आहे.

शिवसेनेतील उभ्या फूटीनंतर आंबेडकरी चळवळीच्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला होता.

शिवसेनेतील ठाकरे गटात विविध भागातील नेत्यांचा प्रवेश होत आहे, त्यात आंबेडकरी चळवळीतील अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ धरली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विविध समुदायातील नेते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधत आहे.

अहमदनगर येथील अशोक गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधले आहे.

उद्धव ठाकरे गटात गेलेल्या गायकवाड यांच्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.