मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राला काळिमा लागणारी गोष्ट देवेंद्र फडवणीस आणि भाजप सरकारची झाली आहे. भाजपमध्ये बलात्कारी मंत्री आहेत. दारुडे मंत्री आहेत. चरस पिणारे मंत्री आहेत तरी पण भाजप सरकार चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी अशा घाणेरड्या लोकांना घालवावेच लागेल. मोहित कंबोज यांच्यासारखी घाण रात्रभर दारू पिऊन धिंगाणा घालतो त्याला कुणाचे संरक्षण आहे ? त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल करतानाच मोहीत कंबोज याच्यावर एफआयआर दाखल करावा अशी मागणी छत्रपती संभाजी बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन कांबळे यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन कांबळे यांनी काल रात्री या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ काढला. त्यानंतर आज त्यांनी खार पोलीस स्टेशन गाठून मोहित कंबोज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा खास मानला जाणारा, राईट हँड मानला जाणारा नेता पहाटे चार, पाचपर्यंत बारमध्ये धिंगाणा घालत होता. पोरींना घेऊन नाचत होता. यावेळी त्याने नको ती नशा केली होती, असा आरोपही कांबळे यांनी केला.
रेडिओ बारमध्ये बसून मोहित कंबोज चरस, गांजा आणि पोरींना घेऊन नाचवत होता. खूप वेगवेगळ्या नशा त्याने केल्या होत्या. आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला धमकी दिली. मला जातिवाचक शब्द बोलले असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरेला विचार ‘मी’ कोण आहे. देवेंद्र फडणवीसला मी फोन लावतो असे धमकावून साडे चार ते पाचपर्यंत त्याने बार चालू ठेवला. तिथे पोरींबरोबर नाचत होता. रात्री उशिरापर्यंत चालणारे असे बार सील केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
आमची बहुजनांची पोरे आणि बहुजन संपत चालला आहे. त्यासाठी छत्रपती संभाजी ब्रिगेडतर्फे आम्ही भारतात आणि मुंबईमध्ये नशा मुक्त पूर्ण अभियान चालू केले आहे. तसेच, मोहित कंबोज याच्यावर एफआयआर दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे, असे त्यांनी सांगितले.