चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पहिल्यांदाच बोलले आहे. नरहरी झिरवाळ ( Narhari zhiraval ) यांच्यावर खरंतर अविश्वास प्रस्ताव आहे की त्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. यावर त्यांनी स्वतःच नियम सांगितला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल थेट सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) चर्चा होत आहे. त्यांच नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये नरहरी झिरवाळ यांनी नियमाचा आधार घेत भाष्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात झिरवाळ यांच्या प्रतिक्रियेनंतर जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी शिवसेनेत उभी फुट पडली होती. त्याच दरम्यान राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला गेला असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
त्यामुळे त्यांनी 16 आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाच्या संदर्भातील विषय थेट न्यायालयात गेला होता. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे संपूर्ण देशभरात चर्चेत आले होते.
त्यानंतर जवळपास सहा महीने उलटून गेले होते. तरी याबाबत नरहरी झिरवाळ यांनी कुठेलेही भाष्य केले नव्हते. त्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतांना नरहरी झिरवाळ यांनी एकप्रकारे खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे.
यावेळी स्पष्टीकरण देत असतांना नरहरी झिरवाळ यांनी म्हंटलंय, एक नोटिस बजावून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. साधा सरपंचावर जरी अविश्वास ठराव आणायचा असल्यास त्याला नोटिस बजवावी लागते.
त्यानंतर ओळख परेड होते किंवा त्यांचे म्हणणे सांगितले जाते आणि मग सरपंचावर अविश्वास ठराव आणला जातो. तर माझी नियुक्ती ही सभागृहात झाली होती. तिथेच माझ्यावर अविश्वास ठराव आणला गेला पाहिजे ना?
इथे तर फक्त नोटिस पाठविली होती. त्याला अविश्वास ठराव म्हणत नाही. अविश्वास ठराव म्हणजे बहुमत घ्यावे लागतं, आणि तरचं माझ्यावर अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल ना इथे तसं झाले नाही असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हंटलं आहे.
याशिवाय झिरवाळ यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीवरही भाष्य केलं आहे. त्यामध्ये नरहरी झिरवाळ यांनी म्हंटलं आहे. जर मी अनधिकृत होतो तर मी निवडलेला व्यक्तिही अनधिकृत होतो की नाही हा संशोधनाचा भाग आहे असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हंटलं आहे.
एकूणच सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी बघता आणि नरहरी झिरवाळ यांनी दिलेली प्रतिक्रिया बघता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.