तब्बल तीन तास रुग्ण लिफ्ट मध्ये अडकला, नातेवाईकाला फोन करुन बोलावले आणि… घाटकोपरच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Aug 27, 2022 | 11:24 PM

घाटकोपर मधील झायनोव्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे उपचारासाठी आलेला रुग्ण लिफ्टमध्ये अडकला होता.  प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण लिफ्ट बंद पडून याच लिफ्ट मध्ये सुमारे तीन तास अडकून पडल्याची घटना या रुग्णालयात घडली आहे.

तब्बल तीन तास रुग्ण लिफ्ट मध्ये अडकला, नातेवाईकाला फोन करुन बोलावले आणि... घाटकोपरच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Follow us on

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर(Ghatkopar) परिसरातील एका खाजगी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेला एक तब्बल एक तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्येच(Lift)अडकला होता. मात्र, कुणीही मदतीसाठी आले नाही. शेवटी या रुग्णाने आपल्या एका नातेवाईकाला फोन करून मदतीसाठी बोलावले. यानंतर या रुग्णाची सुटका झाली आहे. या घटनेमुळे रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णाची प्रकृती ठिक नसताना त्याच्यासह हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

घाटकोपरच्या झायनोव्हा रुग्णालयातील(Zaynova Hospital) प्रकार

घाटकोपर मधील झायनोव्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे उपचारासाठी आलेला रुग्ण लिफ्टमध्ये अडकला होता.  प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण लिफ्ट बंद पडून याच लिफ्ट मध्ये सुमारे तीन तास अडकून पडल्याची घटना या रुग्णालयात घडली आहे.

जयश्री जयसिंग सकपाळ यांना त्यांची मुलं वैभव आणि जितेंद्र हे घाटकोपर च्या एलबीएस मार्गावर असलेल्या झायनोव्हा रुग्णालयात डायलसीस करण्यासाठी घेऊन आले होते. संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णांसाठी असलेली लिफ्ट मधून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला.  मात्र,  लिफ्ट एक मजला वर गेली आणि बंद पडली. त्यांनी रुग्णालयाकडे मदत मागीतली मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

रुग्णालयाकडून मदत मिळत नसल्याने अखेर सकपाळ कुटुंबाने त्यांच्या जवळील नातेवाईकांना फोन करुन त्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर  त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांची सुटका केली.

सकपाळ यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिस आणि अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासानंतर त्यांची सुटका झाली.  रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.