पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी आला ‘मुन्नाभाई’; कॉपीची पद्धत पाहून अधिकारी हादरलेच, मुंबईतील धक्कादायक प्रकार

| Updated on: Jan 12, 2025 | 8:59 PM

पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. परीक्षा देत असताना एका विद्यार्थ्यानं कॉपीचा प्रयत्न केला, मात्र तो रंगेहात पकडण्यात आला आहे.

पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी आला मुन्नाभाई; कॉपीची पद्धत पाहून अधिकारी हादरलेच, मुंबईतील धक्कादायक प्रकार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. काल मुंबईत पोलीस विभागातील विविध पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काल मुंबईत पोलीस विभागातील विविध पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, यासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी मुंबईत विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते, या परीक्षेदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूलमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेला एक तरुण मुन्नाभाई स्टाइलने कॉपी करताना आढळून आला आहे. या उमेदवाराला लेखी परीक्षेदरम्यान ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं.  लेखी परीक्षेदरम्यान आरोपी उमदेवाराने उत्तरे मिळविण्यासाठी कानात ब्लूटूथ लपवला होता. तो वारंवार आपल्या कानाला स्पर्श करत होता त्यामुळे अधिकाऱ्यांनी तरुणाची तपासणी केली त्यावेळी पर्यवेक्षकांना आरोपीच्या कानात छोटेसे ब्लूटूथ डिव्हाइस आढळून आले.

गुन्हा दाखल  

ही घटना ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी आलेल्या या विद्यार्थ्यानं कानात ब्लूटूथ डिव्हाहीस ठेवून कॉपीचा प्रयत्न केला. मात्र तो परीक्षा देत असताना वारंवार कानाला हात लावत होता, त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला, त्यामुळे त्याची झडती घेण्यात आली, त्याची कॉपीची पद्धत पाहून अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. या प्रकरणात  पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध कायदा १९८२ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.