औरंगाबाद : शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. पुरुषांसह महिलांनाही चोप देण्यात आला आहे. बांधाच्या वादातून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Aurangabad Crime Farmer family beaten up over land dispute)
ठिबक सिंचनाच्या पाईपने मारहाण
बांधाच्या वादावरुन शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. नारायण काळे आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण झाली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावात ही घटना घडल्याची माहिती आहे.
ठिबक सिंचनाचे पाईप उपसून कुटुंबावर फेकत मारहाण केले. पुरुषांसह महिलांनाही बेदम मारहाण केल्याचे कॅमेरात कैद झाले आहे. काही जणांना फरपटत नेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
दरम्यान, मारहाण होऊन दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल झालेला नाही. राजकीय दाबावातून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे. औरंगाबादमधील कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या :
VIDEO | शेतीच्या वादातून राडा, दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्यांसह दगड-विटांनी मारहाण
औरंगाबादमध्ये जमिनीचा वाद, होमगार्ड महिलेला नग्न करुन मारहाण
(Aurangabad Crime Farmer family beaten up over land dispute)