लॉकडाऊन रद्द केल्यानंतरचा जल्लोष भोवला, खासदार इम्जियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल

| Updated on: Mar 31, 2021 | 5:11 PM

लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केलेला जल्लोष खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भोवलाय. कारण, या जल्लोष प्रकरणात खासदार जलिल यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन रद्द केल्यानंतरचा जल्लोष भोवला, खासदार इम्जियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
Follow us on

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनानं औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केलेला जल्लोष खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भोवलाय. कारण, या जल्लोष प्रकरणात खासदार जलिल यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Case has been registered against Aurangabad MP Imtiaz Jalil)

खासदार जलिल यांना चूक मान्य

औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतल्यानंतर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. त्यांच्या या कृतीवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर अखेर खासदार जलील यांनी आपली चूक मान्य केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा, असं जलिल यांनी म्हटलंय. पण आपली चूक मान्य करतानाच त्यांनी नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

लॉकडाऊन रद्द, खासदार जलिल यांचा जल्लोष

औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण या निर्णयाला जलिल यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. जलिल यांनी तर या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचे आदेश काल देण्यात आला.

लॉकडाऊन रद्दच्या निर्णयानंतर जलिल आणि त्यांचे काही कार्यक्रर्ते रस्त्यावर उतरले. समर्थकांनी जलिल यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूकही काढली होती.

चंद्रकांत खैरेंकडून जलिल यांच्या अटकेची मागणी

“औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा” अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करु, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावर चंद्रकांत खैरे यांना कायद्याचं ज्ञान नाही. त्यामुळे ते काहीही बोलतात, असा टोला जलिल यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या :

Aurangabad Lockdown : ‘होय माझी चूक झाली, पण नियम मोडणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई करा’- जलिल

इम्तियाज जलील यांचा धांगडधिंगा, खैरेंकडून अटकेची मागणी, खोपकर म्हणतात नाचताना शरम वाटली पाहिजे

Case has been registered against Aurangabad MP Imtiaz Jalil