औरंगाबादः सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची (Banyan Tree) पूजा आज महिला वर्गाकडून करण्यात येते. पण औरंगाबादेत काही पुरुषांनी पुरुषांनी याउलट मागणी करत पिंपळालाच उलट फेऱ्या मारल्या. या पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली. वटपोर्णिमा (Vatpaurnima) साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पूजन करतो, मुंजाला साकडे घालतो की ‘हे मुंजा आम्हाला अशा भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्यापेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव.. असं या पुरुषांनी सांगितलं. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील करोडी येथे पत्नी पीडीत पुरुष (Victim Of Wives) संघटनेचा आश्रम आहेय या संघटनेच्या वतीने वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
पत्नी पीडितांनी सोमवारी आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी केली. हर हर मुंजा करतो पूजा, बायकोपासून सोडव आता… या भारुडासह विविध कविता, आरती, लोकगीते गाऊन पिंपळाच्या झाडाला सरळ 108 आणि त्यानंतर उलट्या 108 प्रदक्षिणा मारल्या. भांडखोर पत्नीपासून मुक्ती मिळावी व तिला सत्कार्य करण्याची सुबुद्धी यावी, यासाठी देवाला साकडं घालण्यात आलं. या वेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग घुसिंगे, भिकन चंदन आदींची उपस्थिती होती.
औरंगाबादेत अनोखी पौर्णिमा, पत्नी पीडितांकडून पिंपळाला फेऱ्या… आयुष्यभर मुंजा ठेव पण .. अशी बायको नको… pic.twitter.com/IZtCRRPbIt
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2022
Aurangabad | वटपौर्णिमेला पत्नीपीडित पुरुष संघटनेचं म्हणणं तरी ऐकून घ्या… pic.twitter.com/BSZBUJlpH3
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2022