औरंगाबाद : केंद्रीय तपास यंत्रणा सध्या सक्रीय आहेत. औरंगाबादमध्ये (Aurangabad) सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे सुरूच आहेत. शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भजोजनाच्या अन्नधान्य पुरवठादार व्यापारावर छापे टाकण्यात आले आहेत. सतीश व्यास असं अन्नधान्य पुरवठादार व्यापाऱ्याचे नाव आहे. सतीश व्यास यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकण्यात आले आहेत. एका ठिकाणी 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सध्या तपासणी सुरू आहे. चारही ठिकाणे मिळून 56 अधिकाऱ्यांचा छाप्यांमध्ये समावेश आहे. राजस्थानमधील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी (Rajasthan Food Grain Scam Case) छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. सतीश व्यास यांच्याकडे राजस्थानातील अन्नधान्य पुरवठ्याचा ठेका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी देशात अनेक ठिकाणी पडले आहेत. औरंगाबादेत सतीश व्यास यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती महत्वाची कागदपत्रे पडल्याची माहिती आहे.