औरंगाबाद : वाघिणीचाच पाय पडून बछड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबादमधील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात (Aurangabad Siddharth Zoo) घडली आहे. भक्ती वाघिणीचा पाय पडून आठवड्याभरापूर्वी जन्मलेल्या बछड्याचा करुण अंत झाला. या दुर्दैवी घटनेमुळे उद्यानासह प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Aurangabad Siddharth Zoo Bhakti Yellow Tigress accidentally Steps on Cub to Death)
बछड्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव
सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील पिवळ्या रंगाच्या भक्ती वाघिणीने एका आठवड्यापूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला होता. परंतु नकळत भक्तीचा पाय स्वतःच्या बछड्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. बछड्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
वीर वाघ आणि भक्ती वाघिणीचा बछडा
भक्ती वाघिणीने गेल्याच शनिवारी दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला होता. पांढऱ्या रंगाचा वीर वाघ आणि पिवळ्या रंगाच्या भक्ती वाघिणींचे हे दोन बछडे. या दोन बछड्यांमुळे सिद्धार्थमधील पांढऱ्या वाघांची संख्या पाच झाली होती. एवढे पांढरे वाघ असणारे सिद्धार्थ उद्यान राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय मानले जात.
सव्वा तीन महिन्यांनी पुन्हा नवे पाहुणे
सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीने 25 डिसेंबर रोजी पाच वाघिणींना जन्म दिला होता. त्यानंतर सव्वा तीन महिन्यांनी पुन्हा नव्या पाहुण्यांच्या आगमनाने आनंदाचे वातावरण होते.
सिद्धार्थमधील वाघांची संख्या 15 वर
आतापर्यंत 42 वाघांना जन्मस्थान असलेले सिद्धार्थ उद्यान हे व्याघ्रजननाचे नवे केंद्र ठरतेय. सिद्धार्थमधील एकूण वाघांची संख्या आता 15 झाली आहे. त्यात वीर, अर्पितासह चार पांढरे तर 11 पिवळ्या रंगाचे वाघ-वाघीण आहेत. या सर्व वाघांचे पालकत्व एसबीआय बँकेने घेतलेले आहे. (Aurangabad Siddharth Zoo Bhakti Yellow Tigress accidentally Steps on Cub to Death)
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात नवे सवंगडी; समृद्धी वाघीणीने दिला पाच बछड्यांना जन्म
‘टीव्ही 9’ च्या प्रतिनिधीचं ‘अवनी’ वाघिणीसाठी भावनिक पत्र
सापळा लावून वाघीण मारली, ताडोबात वाघिणीच्या शिकारीने खळबळ
(Aurangabad Siddharth Zoo Bhakti Yellow Tigress accidentally Steps on Cub to Death)