कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा चर्चेत, सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

| Updated on: Jul 13, 2023 | 6:58 PM

कधी जमीन घोटाळा, कधी भूखंड घोटाळा, कधी अनुदान घोटाळा कधी पासेस घोटाळा. यामुळे सत्तार नेहमीच चर्चेत राहिलेत. पण या वेळेला सत्तार एका वेगळ्याच कारणामुळे अडचणीत आलेत.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा चर्चेत, सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Follow us on

औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांच्या संपत्ती संदर्भात माहिती दिली होती. त्या माहितीवर आधारित काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे गांधी टोपी आणि साधारण वेशभूषेत गळ्यात रुमाल घालतात. सत्तार गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे अडचणीत येताना दिसत आहेत. कधी जमीन घोटाळा कधी भूखंड घोटाळा कधी अनुदान घोटाळा कधी पासेस घोटाळा. यामुळे सत्तार नेहमीच चर्चेत राहिलेत. पण या वेळेला सत्तार एका वेगळ्याच कारणामुळे अडचणीत आलेत.

न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

अब्दुल सत्तार यांनी 2019 मध्ये विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नावे असलेली प्रॉपर्टी त्यांच्या मुलांची नावे असलेली प्रॉपर्टी आणि पत्नीच्या नावे असलेली प्रॉपर्टी याच्या व्हॅल्युएशनमध्ये गफलत केली. ही बाब शहरातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पल्ली यांच्या लक्षात आली. त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. चार वर्षे न्यायालयाच्या दरबारात खेडे घातले. त्यानंतर आता कुठे महेश शंकर पल्ली यांच्या अर्जानुसार न्यायालयात खटला चालू करण्याचे आदेश मिळालेत.

असे आहेत आरोप

आदेश मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जाते. अब्दुल सत्तार यांनी आपल्या पत्नीच्या नावाने मुलांच्या नावाने स्वतःच्या नावाने असलेल्या अनेक प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन हे अत्यंत कमी केले. असा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप आहे. याची पोलीस खात्यामार्फत अनेक वेळा तपासणी झाली.

सिल्लोड न्यायालयात चालणार खटला

मात्र पोलिसांनी योग्य अहवाल दिला नाही. असा आरोप करून फिर्यादींनी न्यायालयामार्फत खटला चालवण्याची विनंती केली. याच विनंतीनुसार न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात खटला चालवण्याच्या मागणीला मंजुरी दिली. यापुढे अब्दुल सत्तार यांच्या विरोधातील खटला सिल्लोड जिल्हा न्यायालयात चालणार आहे.