साकीनाका बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर वातावरण तापलं, भाजपचे औरंगाबादेत आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Sep 11, 2021 | 4:55 PM

भाजप महिला आघाडीकडून न्यू गणेश मंडळासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप नेते महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

साकीनाका बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर वातावरण तापलं, भाजपचे औरंगाबादेत आंदोलन, जोरदार घोषणाबाजी
AURANGABAD PROTEST
Follow us on

औरंगाबाद : मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. राज्यभरातून राजकीय नेते तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. औरंगाबादमध्ये भाजप महिला आघाडीच्या नेत्या तसेच कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. भाजप महिला आघाडीकडून न्यू गणेश मंडळासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप नेते, महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (aurangabad bjp protested against mumbai sakinaka women rape case)

औरंगाबादेत भाजपचे आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी 

मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करुन त्याच्या खासगी भागांना इजा पोहचवण्यात आली. यातच या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात सगळीकडे खळबळ उडाली. या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला आहे. ही घटना घडताच आता औरंगाबादेत भाजपतर्फे मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्या तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राज्य सरकार, पोलीस प्रशासन तसेच महिला अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबादच्या न्यू गणेश मंडळासमोर हे आंदोलन करण्यात आले. भाजप रस्त्यावर उतरल्यामुळे या भागात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता.

साकीनाका बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

गणेशोत्सवसारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल (10 सप्टेंबर) एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली. 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारण 3 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं.

गणेशोत्साव सारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली आहे. अतिशय निंदणीय प्रकार घडला आहे. 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारण 3 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं. संबंधित अधिकारी दहा मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा तिथे एका उघड्या टेम्पोच्या आतमध्ये पीडित महिला अत्यंत नाजूक परिस्थित आढळली. त्यावेळी त्यांनी तातडीने निर्णय घेऊन महिलेला इतत्र शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी चौकीदाराकडून घेऊन स्वत: पोलिसांनी गाडी चालवत ताबोडतोब राजावाडी हॉस्पिटलमध्ये महिलेला दाखल केलं. डॉक्टरांनी पीडितेवर त्वरित उपचार सुरु केले होते. मात्र, या महिलेचा उपचारादम्यान मृत्यू झाला.

खटला फास्टट्रॅक कोर्टात

दरम्यान, या बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहनला अटक करण्यात आलं आहे. त्याला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसीपी ज्योस्ना रासम या अनुभवी महिला अधिकारी आहेत. त्यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली एक विशेष तपास पथक तैनात करण्यात आले आहे. हा खटाल फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल.

इतर बातम्या :

Saki Naka rape : आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

Mumbai Sakinaka case : मृत्यूपूर्वी पीडितेची रुग्णालयात चौकशी, महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

(aurangabad bjp protested against mumbai sakinaka women rape case)