Aurangabad | चिकलठाणा परिसरात कचरा डेपोला आग, कचरा प्रक्रिया केंद्राचे मोठे नुकसान

| Updated on: Apr 15, 2022 | 4:27 PM

सकाळच्या सुमारास लागलेल्या या कचरा प्रक्रिया केंद्राच्या आगीने काही वेळातच पेट घेतला. या आगीत केंद्रातील सर्व यंत्रसामग्री जळून खाक झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

Aurangabad | चिकलठाणा परिसरात कचरा डेपोला आग, कचरा प्रक्रिया केंद्राचे मोठे नुकसान
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील चिकलठाणा (Chikalthana) परिसरात असलेल्या कचरा डेपोला आज सकाळच्या सुमारास भीषण आग (Fire) लागली होती या आगीमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात जगालाच मात्र कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशनरी सुद्धा जळून खाक झाल्या आहेत. मागील आठड्यातच नारेगाव (Naregaon) येथील भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. त्यानंतर आता चिकठाणा येथील कचरा डेपोला आग लागली आहे. यात कचरा प्रक्रिया केंद्राचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

आगीचे कारण काय?

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्र हे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र आज शुक्रवारी सकाळीच या ठिकाणी मोठी आग लागली. ही आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण कळाले नाही, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आग विझवण्यासाठीचे तीन बंब आणि इतर वाहनांद्वारे ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले गेले.

पाच तास धुमसत होते केंद्र

सकाळच्या सुमारास लागलेल्या या कचरा प्रक्रिया केंद्राच्या आगीने काही वेळातच पेट घेतला. या आगीत केंद्रातील सर्व यंत्रसामग्री जळून खाक झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी पोहोचले. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली.

इतर बातम्या-

Me Vasantrao: ‘चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं’; रघुनाथ माशेलकरांची प्रतिक्रिया

Onion : नादच केलाय ग्रेट!! कांद्याचे एकरी उत्पन्न पाहून खुद्द कुलगुरूच पोहोचले बांधावर, अहमदनगरच्या शेतकऱ्याची Success Story