शेंदूर फासलेल्या दगडांखाली चक्क मृतदेह पुरला! 3 महिन्यांनी कसा समोर आला प्रकार?

| Updated on: Dec 15, 2022 | 9:52 AM

3 महिन्यानंतर घराचं कुलूप फोडून आत पाहिलं तर सापडला चादरीत गुंडाळलेला मृतदेह! कुजून उरला होता केवळ सांगाडा

शेंदूर फासलेल्या दगडांखाली चक्क मृतदेह पुरला! 3 महिन्यांनी कसा समोर आला प्रकार?
औरंगाबाद मधील धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद : वाळूज येथे एका बंद घरात एक मृतदेह पुरण्यात आला होता. तीन महिन्यांपासून बंद असलेल्या या घराचं कुलूप फोडून जेव्हा पाहणी करण्यात आली, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या बंद घरात दोन शेंदूर फासलेले दगड आढळून आले. त्या दगडांखाली मृतदेह एका चादरीत पुरण्यात आलेला होता. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून नुसता सांगाडा उरला होता. हा घातपाताचा प्रकार आहे, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. तसंच नरबळीचा संशही व्यक्त करण्यात आला आहे.

वाळूज येथील समता कॉलनीमध्ये सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचं घर आहे. शेळके यांचं दुमजली घर तीन महिन्यांपासून बंद होतं. 7 महिन्यांपूर्वी या घराचा तळमजला भाडे तत्त्वावर एका कुटुंबाला देण्यात आला होता.

या कुटुंबाने भाड थकवल्यानं शेळके त्यांना सातत्यानं फोन करत होते. पण फोन उचलला जात नसल्यानं अखेर शेळके यांना थेट घर गाठलं. फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथील काकासाहेब भुईगड यांनी हे शेळके यांच्या घरात भाड्याने राहायला होता. ते आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह या घरात राहत होते.

नवरात्रीत भुईगड हे आपल्या गावी जाणार असल्याचं सांगून गेले. लवकरच भाडं देऊन असं सांगून गेले. पण नंतर त्यांचा फोन बंद येत असल्यानं शेळके एक दिवस घरी धडकले.

घरी आले असता कुलूप पाहून शेळके यांना शंका आली. त्यांना 3 महिन्यांपासून घर बंद असल्याचं कळलं. जेव्हा घराचं कुलूप फोडून त्यांनी आत पाहिलं तेव्हा ते हादरले. घरातील साहित्य गायब होतं.

स्वयंपाक घरातील ओट्याखाली खोदकाम करण्यात आलं होतं. सिमेंट वाळूने ते बंद करण्यात आलं होतं. तसंच त्यावर शेंदूर फासलेले दोन दगड, लिंबू आढळून आले होते. दरम्यान, हे काम जेव्हा उकरुन काढण्यात आल, तेव्हा एक कुजलेला मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवल्याचं आढळून आलं.

हा सगळा प्रकार संशयास्पद पोलिसांनाही कळला. त्यानंतर हा घातपाचा किंवा नरबळीचा प्रकार असावा, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. भाडेकरुन भुईगड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून जेला जातो आहे. त्यासाठी पथकही रवाना करण्यात आलं असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. हा मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा याचंही गूढ कायम असून नेमका हा सगळा प्रकार आहे तरी काय, हे शोधून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.