औरंगाबादेत आम्ही पाणी योजना आणली, शिवसेनेने तीदेखील पूर्ण होऊ दिली नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

| Updated on: Feb 21, 2022 | 2:51 PM

देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या विकासावर भाष्य करताना म्हणाले, आमच्या मनात मराठवाडा आहे, मात्र काही लोकांना मराठवाडा फक्त भाषणापुरता आहे, त्यांच्या मनात मराठवाडा नाही, वैधनिक विकास गेला. आम्ही मराठवाड्याचा विकास लक्षात घेऊन दुष्काळ भागात पाणी आणण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबादेत आम्ही पाणी योजना आणली, शिवसेनेने तीदेखील पूर्ण होऊ दिली नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
Follow us on

औरंगाबादः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गंगापूर तालुक्यातील भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्यावतीने ग्रामीण संगोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) तीव्र शब्दात टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक शासकीय योजनांद्वारे ग्रामीण भागातील लोकांना रोजगारासाठी संधी निर्माण केली, असून काही लोक नुसतेच मराठवाड्याच्या नावावर भाषणबाजी करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पाणी योजनेवर फडणवीसांची टीका

शहराती 1680 कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेवरून भाजप आधीच आक्रमक झाली आहे. कालच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या योजनेचे काम वेळेत पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला होता. याच मालिकेत पुढे भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबाद शहराने शिवसेनेला ओळख दिली. इथली नवी पाणी योजना आम्ही आणली. मात्र शिवसेनेने तीदेखील पूर्ण होऊ दिलेली नाही. इथल्या शेतकऱ्यांसमोर अडचणी आल्या, मात्र या सरकारने त्यांना मदत केली नाही. आमच्या सरकारने प्रत्येक संकटात शेतकऱ्यांना मदत केली, मात्र आतचं सरकार हरवलं आहे.

सरकार मुंबईतल्या बिल्डिंग, दलालीत अडकलंय- फडणवीस

गंगापूर येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्याचं राज्य सरकार मुंबईतल्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आणि तिथल्या दलालीत अडकलं आहे. त्यांना मराठवाड्याचं काहीही सोयरसुतक नाही. मात्र प्रत्येकाकडे समृद्धी पोहोचली पाहिजे, शौचालय, गॅस, वीज अशा विविध योजना गरीबांना मिळाव्यात यासाठी मोदीजींनी योजना सुरु केल्या. कामगारांना संघटित केले, त्याचे इ श्रम कार्ड घरोघरी पोहचण्याचे काम केल जात आहे.

वॉटरग्रीड योजनेला विष देऊन मारलं- फडणवीस

देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या विकासावर भाष्य करताना म्हणाले, आमच्या मनात मराठवाडा आहे, मात्र काही लोकांना मराठवाडा फक्त भाषणापुरता आहे, त्यांच्या मनात मराठवाडा नाही, वैधनिक विकास गेला. आम्ही मराठवाड्याचा विकास लक्षात घेऊन दुष्काळ भागात पाणी आणण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ घालवण्यासाठी वाटरग्रीड योजनेचा खून केला, हळूहळू विष देऊन मारलं. आताचं सरकार हरवलं आहे, त्यांना मराठवाडा कुठे आहे हे माहित नाही. शेतकऱ्यांची विज कापली जात आहे, अनेक धनाध्य लोक वीजवील भारत नाही, मंत्री म्हणतात विज वापरली तर बिल भरावं लागेल, तुमची पगार दोन अडीच लाख आहे, तर ते सरकार बिल भरते तुम्हाला काय कळणार, सरकार तर्फे एक तरी प्रवक्ता गोगजरिबांवर बोलला आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

इतर बातम्या-

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

VIDEO | हळदीला मित्रांचा आग्रह, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच लग्नाच्या मुहूर्तावरच फरार