औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोनाची तिसरी लाट (Corona Third wave) ओसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेने इतर मूळ सेवांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील (Aurangabad district) कुष्ठरोग विभागाने मागील दहा दिवसात केलेल्या सर्वेक्षणात 26 कुष्ठरोगी आढळले आहे. विशेष म्हणजे मागील दहा महिन्यांतील सर्वेक्षणात जिल्ह्यात दीडशे रुग्ण आढळले आहेत. मागील दोन वर्षे कोरोना संकटाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. संपूर्ण आरोग्य यंत्रणा (Health system) कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी गुंतलेली होती. आता मात्र यंत्रणेवरचा ताण कमी झाल्यामुळे आरोग्यसंबंधी इतर समस्यांचा आढावा घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार, कुष्ठरोग्यांचे सर्वेक्षण केले असता, गंभीर बाब समोर आली.
जिल्ह्यातील कुष्ठरोग्यांची आकडेवारी वाढण्यामागील कारणे नेमकी काय आहेत, याचेही सर्वेक्षण जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. त्यानुसार, कोरोनाच्या काळात लक्षणे दिसत असनातानी टेस्ट न करणण्याकडे नागरिकांचा कल होता. इतर आजारांच्या बाबतीतही असे प्रकार झालेले आढळून आले आहे. न्यूनगंड, समाजाची भीती यामुळेही असे रुग्ण उपचार घेण्यासाठी पुढे येत नाहीत. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी आदींच्या सर्वेक्षणातून कुष्ठरोगाचे रुग्ण शोधून त्यांचे समुपदेशन व उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.
1 ते 10 फेब्रुवारी दरम्यानच्या दहा दिवसातच औरंगाबाद तालुक्यात आठ, सोयगावात अकरा, पैठणमद्ये तीन, सिल्लोड आणि वैजापूरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले. तर मागील दहा महिन्यात म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून आढळलेले कुष्ठरोगी पुढीलप्रमाणे-
औरंगाबाद- 71
गंगापूर- 16
कन्नड- 27
खुलताबाद- 02
पैठण- 11
सिल्लोड-13
फुलंब्री-02
सोयगाव- 22
वैजापूर- 11
एकूण- 175
कुष्ठरोगाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाच्या अंगावर चट्टे येणे, भुवयाचे केस कमी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, हाता-पायाला मुंग्या येणे, आदी लक्षणे दिसतात. ही लक्षणे जाणवताच रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात सोयगाव, पैठण आणि कन्नड हे कुष्ठरोगाचे अतिजोखमीचे तालुके आहेत. आढळलेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका जास्त असतो. जंतूंपासून हा रोग पसरत असल्याने, रुग्णाच्या सहवासातील लोकांना बाधा होण्याची शक्यता असते. वेळीच उपचार सुरु झाल्यास रुग्ण 6 ते 12 महिन्यात बरा होतो.
इतर बातम्या-