औरंगाबाद| होळीनंतर महाराष्ट्रात जणू राजकीय धुळवड सुरु आहे. एकिकडे एमआयएमने (MIM) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे तर भाजपनेही महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना खुली ऑफर दिली आहे. महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी भाजपमध्ये सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केलं. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना हे वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे विकास खुंटला आहे. काही मंत्र्यांवर आरोपही आहेत. त्यामुळे बरेच आमदार नाराज असल्याचं मत डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नाराज आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, असं वक्तव्य करताना डॉ. भागवत कराड म्हणाले, ‘ महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीमुळे विकास खुंटला आहे. काही मंत्र्यांवर थेट दाऊन इम्ब्राहिमशी संबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. अशा स्थितीत भाजप कार्यकर्ता आणि केंद्रातला मंत्री म्हणून मी सांगतो, ज्यांना वाटतं, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, त्यांनी एकत्र जमलं पाहिजे. महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं तर विकास होईल, असं मला नक्कीच वाटतं, असं वक्तव्य डॉ. कराड यांनी केलं.
डॉ. भागवत कराड पुढे बोलताना म्हणाले, ‘ परवा मी जालन्याच्या सभेत मी बोललो. जालन्याच्या काँग्रेसच्या आमदाराने विकासासाठी कमळही हातात घेण्याची तयारी दर्शवली. तेव्हाही मी म्हणालो की, तुम्हाला वाटतं भाजप विकास करतोय, तर तोच मुद्दा घेऊन मी सांगू शकतो की, त्या आमदारांना माझं खुलं आव्हान आहे.. त्यांनी जॉइन करावा, असं वक्तव्य डॉ. कराड यांनी केलं.
दरम्यान, महाविकास आघाडतील अनेक आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा काल जालन्यात भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब यांनी केला होता. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधले 25 आमदार बहिष्कार टाकणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली, असा गौप्यस्फोट दानवेंनी केला. तसेच आताच या आमदारांची नावं सांगितली तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल, असं वक्तव्यही त्यांनी केलं.
इतर बातम्या-