औरंगाबादः ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या (Gram Panchayat Election) निवडणुकांप्रमाणेच गाव पातळीवर विविध सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आता राजकीय रंग चढलेले दिसून येतात. अनेक सेवा संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची स्पर्धा लागलेली असते. पैठण तालुक्यात एकूण 82 सहकारी संस्था आहेत. या सर्व संस्थांची मुदत संपलेली असून त्यांच्या निवडणुका लागणे अपेक्षित होते. मात्र यापैकी एकाही संस्था किंवा सोसायटीने निवडणुकीसाठी निबंधक कार्यालयात पैसे भरले नसल्याने येत्या आठ दिवसात येथे प्रशासकाची नियुक्ती केली जाणार असल्याने निबंधक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्था, समिती सदस्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्यासाठी यंजा प्रथमच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची (Election Authority) स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी ती स्थानिक पातळीवर घेतली जात असे. मात्र यंदा प्राधिकरणाची नेमणूक झाल्याने हा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा भरण्याची संस्थांची क्षमता नसल्याने पैठणमधील एकाही सोसायटीच्या वतीने सदस्यांसाठीचे पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे येथील निवडणुका (Co operative society elections) लांबणीवर पडून येत्या आठ दिवसात प्रशासकांची नेमणूक होणार आहे.
पैठण तालुक्यातील 82 सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. आता पुढील निवडणुकांसाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायची अनामत रक्कम निर्धारित करणे अनिवार्य आहे. मात्र एकाही संस्थेने ती रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे या सर्व संस्थांवर येत्या आठ दिवसात प्राधिकृत अधिकारी नेमण्यात येतील, असे पैठण येथील निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक अनिल पुरी यांनी सांगितलं.
1 ते 100 सदस्यांसाठी किमान 353 रुपये, कमाल 35,300 रुपये
101 ते 300 सदस्यांसाठी किमान 198रुपये कमाल 59,400 रुपये
301 ते 500 सदस्यांसाठी किमान167रुपये कमाल 83,500 रुपये
501 ते 1000 सदस्यांसाठी किमान 144रुपये कमाल 1,44000 रुपये
दरम्यान, पैठण तालुक्यातील विविध सहकारी सोसायट्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने त्यांना सदस्य निवडणुकांचा खर्च भरणे अशक्य असल्याची माहिती संस्थांच्या सदस्यांनी दिली आहे. त्यामुळे आता या सर्व 82 सहकारी सोसायट्यांमध्ये प्राधिकृत अधिकारी नियुक्त केला जाऊ शकतो.
दरम्यान, सोयगाव तालुक्यातील 32 सेवा संस्थांपैकी आठ सेवा संस्थांच्या मतदार याद्या जिल्हा उपनिबंधक औरंगाबाद यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. या आठ सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कार्यक्रम जाहीर झाला नसल्याची माहिती सहाय्यक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली आहे.
इतर बातम्या-