औरंगाबाद : शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सावखेड गंगा गावामध्ये घडली. या हाणामारीमध्ये सैन्यात नोकरीला असलेला एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी (11 जुलै) सकाळी 11 वाजता ही घटना घडली. या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Aurangabad fighting between Two group over farm dispute young man serving in army seriously injured)
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सावखेड गंगा या गावात दोन गटांमध्ये मागील अनेक दिवसांपासून शेतीमुळे वाद सुरु आहे. या वादाचे पर्यवसान आज तुंबळ हाणामारीमध्ये झाले. या मारहाणीमध्ये पाच ते सहा जणांनी मिळून सैन्यामध्ये नोकरीला असलेल्या एका तरुणाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये हा तरुण गंभीर जमखी झाला असून त्याच्यावर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेतीच्या वादातून ही घटना घडली.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी म्हणजेच 26 जून रोजी औरंगाबाद जिल्ह्यात अशाच प्रकारे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेचादेखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल गावात घडली होती. यामध्ये एक शेतकरी जखमी झाला होता.
पाहा व्हिडीओ :
शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी pic.twitter.com/db3jjXfxQC
— Anish Bendre (@BendreAnish) June 26, 2021
इतर बातम्या :
मृतकांच्या आत्मशांतीसाठी अमावस्येच्या रात्री प्रेत जागृती, अघोरी प्रकाराने मलकापूर शहर हादरलं
(Aurangabad fighting between Two group over farm dispute young man serving in army seriously injured)