आता यात बुडून मरायचं का? ढगफुटीनं उभं पिक जमिनीच्या घशात… गावकरी संतप्त!

| Updated on: Oct 20, 2022 | 1:05 PM

बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास येथे गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.

आता यात बुडून मरायचं का? ढगफुटीनं उभं पिक जमिनीच्या घशात... गावकरी संतप्त!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, औरंगाबादः औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात शिल्लेगावात ढगफुटीने (Cloud Burst) हाहाकार माजला आहे. गंगापूर तालुक्यात हा परिसर येतो. बुधवारी रात्री आठ-साडे आठच्या सुमारास येथे मुसळधार (Heavy Rain) पावसाला सुरुवात झाली. ढगफुटीमुळे संपूर्ण शिवारात पाणी साचलंय. यामुळे मका आणि कपाशीचं मोठं नुकसान झालंय. अनेक शेतांना तळ्याचं रुप आलंय. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिक वाहून गेलं.

यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. औरंगाबादेत ५-५ मंत्री असून गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी जगलेला पहायचा असेल तर तत्काळ शेतकऱ्याला मदत द्या…

सरकारने येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनाम्याचा कोणताही फार्स करू नये, अशी विनंती येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास येथे गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.

पाहा, गावाची-शिवाराची स्थिती—

अहमदनगर जिल्हयातही  थैमान ..

अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलंय. विविध भागात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. राहाता येथील तहसील कार्यालय , विज वितरण कार्यालयाला पाण्याचा वेढा पडला. अनेक घरात पाणी शिरल्याने संस्कार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय. तर नागरिकांना घराबाहेर निघणंही मुश्किल झालंय.

शेतपिकांचही मोठ नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राहाता – पिंपळस हद्दीतील ओढ्याला पूर आला. महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली .प्रशासनाने ओढ्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय…