कन्नड: औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील (Aurangabad Kannad Taluka) हिवरखेडा नांदगीरवाडी (Hivarwadi Nandgeerwadi) येथील शिवारात विद्युत तारांची जोडणी करत असताना विजेच धक्का (Electric Shock) लागून नावडी येथील चार तरुण मजुरांचा मृत्यू (Four Emloyee Death) झाल्याची घटना घडली आहे. नावडी येथील हे तरुण विद्युत खांब उभा करणे, त्यावर विद्युत तारा ओढून देणे आदी वीज पुरवठासंबधी कामे करत होती. काम सुरू आसताना विद्युत पुरवठा सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून नावडी येथील गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जुन मगर हे चौघे जण जागीच ठार झाले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट जमादार सतिष खोसरे, पो ना संजय आटोळे हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यानंतर मृतांचे नावडी येथील नातेवाईक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.
मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई झाल्यावर नेमकी घटना कशामुळे घडली, हे काम खाजगी कंत्राटदारांचे की महावितरणचे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
या अपघातात तरुण मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ होत आहे. काम सुरू असताना वीज प्रवाह सुरू कसा झाला असा सवाल मृतांचे नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. मृतांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.
मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई झाल्यावर नेमकी घटना कशामुळे घडली हे स्पष्ट होणार आहे. चार तरूण मुले जागीच मृत्यू झाल्याने हे काम खाजगी कंत्राटदारांचे आहे की, महावितरणचे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील कारवाई अजून होऊ शकली नाही.