औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यात खोडा घालणाऱ्या ब्रृजभूषण सिंहांची (Brijbhushan Singh) भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं रचलेला सापळा आहे, असा आरोप मनसेकडून केला जात आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी यावर आज सविस्तर चर्चा केली. पुण्याची सभा झाल्यावरच मी हा आरोप केला होता. पवार आणि शिवसेना मिळून हा सापळा रचत असल्याचं मी म्हटलं होतं, असं प्रकाश महाजन यांनी औरंगाबादमध्ये चर्चेदरम्यान सांगितलं. खरं तर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आम्हाला भाजपकडून वेगळी अपेक्षा होती. पण त्यांनीदेखील ब्रृजभूषण सिंहांच्या प्रकरणात मौन धारण केलेलं दिसतंय. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना भीष्माचार्यांनी ज्याप्रमाणं मान झुकवली होतं, तशीच भूमिका भाजपची असल्याचा गंभीर आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.
प्रकाश महाजन यांनी शिवसेनेवर आरोप करताना म्हटलं की, शिवसेनेचीच तर सध्या खूपच गोची झाली आहे. हिंदुत्व सोडताही येईना आणि धरताही येईल. उद्धवजींचं भाषण पाहिलं तर सोनिया गांधींना कसं बरं वाटेल, शरद पवारांना कसं बरं वाटेल, त्यातून राज साहेबांची कशी अडवणूक करायची. म्हणून हा ब्रृभूषणसिंग हा माणूस उभा राहिला. त्यानीच एका मुलाखतीत सांगितलं की सुप्रियाताई संसदेत आम्हाला नाश्ता द्यायच्या. म्हणजेच ते खाल्या मिठाला जागले. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि शरद पवार इकडचे आश्रय दाते…’
प्रकाश महाजन म्हणाले, ‘उत्तर भारतीयांचा आणि मनसेचा संघर्ष होऊन जवळपास 12-14 वर्ष झाली. हा संघर्ष का झाला, याची कारणंही सबळ आहेत. महाराष्ट्रात रेल्वे विभागात नोकऱ्या होत्या. परीक्षा हिंदितून ठरवली. जाहिरात उत्तर प्रदेश व बिहारच्या वृत्तपत्रात आली. सहाजिकच तिकडचे मुलं मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर आले. आमच्या कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली आणि मग मॉब मेंटॅलिटीतून हा सगळा प्रकार झाला. त्यानंतर ममता बॅनर्जींनी योग्य निर्णय घेतला. संबंधित भागातील प्रादेशिक भाषेतच परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय दिला. त्यामुळे युपीची मुलं इकडे आले नाहीत, आमची मुलं तिकडं गेले नाहीत.’
ब्रृजभूषण सिंहांच्या भूमिकेवरून प्रकाश महाजन यांनी दहा सवाल उपस्थित केले आहेत. ते असे-