औरंगाबादः शहरवासियांसाठी आणि एकूणच शहरात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबाद महापालिकेचे (Aurangabad municipal corporation) 250 रुपयांचे कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी (Smart city) प्रकल्पांसाठी महापालिका जो वाटा भरणार होती, त्यासाठीचा निधी महापालिकेकडे येईल. महापालिकेचा स्मार्ट सिटीसाठीचा 182 कोटी रुपयांचा वाटा शिल्लक होता. आता लवकरच तो भरला जाईल. तसेच स्मार्ट सिटीतून प्रस्तावित उर्वरीत कामे आता मार्गी लागतील, असे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी सांगितले. महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत एकूण एक हजार कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात केंद्र शासनाचे 500 कोटी तर राज्य सरकार आणि महापालिकेचा वाटा प्रत्येकी 250 कोटी रुपयांचा आहे.
त्यानुसार, केंद्र शासनाने आतापर्यंत 294 कोटी रुपये दिले आहेत. तर राज्य शासनाने 147 कोटी रुपये दिले आहेत. यानंतर महापालिकेला 250 कोटी रुपयांचा हिस्सा भरायचा होता. महापालिकेने फक्त 68 कोटी रुपये भरले होते. उर्वरीत 182 कोटींचा हिस्सा भरणे बाकी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून 309 कोटी रुपयांचा हिस्सा आणखी मिळणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील आठवड्यात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर 250 कोटी रुपयांचे कर्ज बुधवारी मंजूर झाले. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे आता 491 कोटी रुपयांचा निधी राहणार आहे.
महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या निधीचा हिस्सा मिळेल. त्यानंतर स्मार्ट हेल्थ, स्मार्ट एज्युकेशन, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण, सफारी पार्कचे पुढील बांधकाम अशी कामे प्रस्तावित आहेत.
इतर बातम्या-