औरंगाबाद पालिकेचे मिशन भंगार हटाव, आतापर्यंत 21 बेवारस वाहने जप्त, 26 हजारांचा दंड

| Updated on: Aug 05, 2021 | 4:36 PM

महानगरपालिकेने मिशन भंगार हटाव हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत वाहतुकीस ठरणाऱ्या बेवारस वाहनांना जप्त केले जात आहे.

औरंगाबाद पालिकेचे मिशन भंगार हटाव, आतापर्यंत 21 बेवारस वाहने जप्त, 26 हजारांचा दंड
AUANGABAD BHANGAR HATAVO
Follow us on

औरंगाबाद : महानगरपालिकेने मिशन भंगार हटाव हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांना जप्त केले जात आहे. पोलिकेने आतापर्यंतच्या कारवाईत रस्त्यावर उभी असणारी 21 वाहने जप्त केली आहेत. तर वाहन मालकांना 26 हजारांचा दंड लावला आहे. (Aurangabad Municipal Corporation started Bhangar hatao campaign in which pick up 21 vehicles)

आधीच वाहतुकीची समस्या त्यात बेवारस वाहनांची गर्दी

कोरोना निर्बंधांच्या शिथिलीकरणानंतर औरंगाबादेत बाजारपेठा गजबजत आहेत. लोकांची गर्दी वाढत आहेत. परिणामी वाहतुकीचीसुद्धा समस्या निर्माण होत आहे. त्यात शहरातील बेवारस वाहनांचे प्रमाणदेखील वाढत आहे. आधीच वाहतुकीची समस्या त्यात बेवारस वाहनांची गर्दी यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. परिणामी औरंगाबाद पालिकेने ही समस्या सोडवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलिकेने भंगार हटाव मिशन जोरात सुरु केले आहे.

रस्त्यावर उभी असणारी 21 वाहने जप्त करण्यात आली

या मिशन अंतर्गत वाहतुकीस अडथळा ठऱणाऱ्या बेवारस वाहनांना जप्त केले जात आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत रस्त्यावर उभी असणारी 21 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 26 हजार वाहनांना दंड लावण्यात आल आहे. मागील तीन दिवसात 21 बेवारस आणि नियमबाह्य पद्धतीने उभी केलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. तसेच या वाहनामुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढत आहे. याच कारणामुळे पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी, MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर राज्यपालांची सही, दत्तात्रय भरणेंच्या भेटीला यश

कोण अमृता फडणवीस? ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था! किशोरी पेडणेकरांचा जोरदार टोला

महापुरानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांचं मोठं नुकसान, नितीन गडकरींकडून 100 कोटीचा निधी मंजूर

(Aurangabad Municipal Corporation started Bhangar hatao campaign in which pick up 21 vehicles)