औरंगाबाद मनपाचा मोठा निर्णय, आता आरोग्य पथक घरोघरी जाऊन लसीकरण करणार

| Updated on: Aug 08, 2021 | 6:52 PM

नागरिकांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा मोठा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे. या मोहिमे अंतर्गत आजारपणामुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या दिव्यांग, दुर्धर आजार असलेले आणि बेडवरून उठू न शकणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.

औरंगाबाद मनपाचा मोठा निर्णय, आता आरोग्य पथक घरोघरी जाऊन लसीकरण करणार
vaccination
Follow us on

औरंगाबाद : नागरिकांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा मोठा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे. या मोहिमे अंतर्गत आजारपणामुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या दिव्यांग, दुर्धर आजार असलेले आणि बेडवरून उठू न शकणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाने सर्वेक्षण सुरु केले आहे. (Aurangabad Municipal Corporation will execute door to door corona vaccination campaign to vaccinate citizens)

लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून प्रयत्न

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाला थोपवायचे असेल तर कोरोना प्रतिंबधक लस हा एक नामी उपाय असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. याच कारणामुळे लसीकरणापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.

घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय

त्याचाच एक भाग म्हणून मनपाने औरंगाबाद शहरात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिव्यांग, दुर्धर आजार असलेले आणि बेडवरून उठू न शकणाऱ्या रुग्णांना कोरोना लस दिली जाणार आहे. त्यासाठीची पहिली तयारी म्हणून दिव्यांग तसेच आजारी रुग्णांचा मनपा शोध घेत आहे. त्यासाठी मनपाने सर्वेक्षण सुरू केले आहे.

महापालिकेतर्फे फिरते पथक तैनात करण्यात येणार

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतर्फे फिरते पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच या पथकातर्फे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेविषयी सविस्तरपणे बोलताना “18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण आहे. कोणीही लसीपासून वंचित राहू नये यासाठी मनपा थेट घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणार आहे,” अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

..तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा, कारण काय?

VIDEO : औरंगाबादेत वर्दीतल्या पोलीस निरीक्षकाची दादागिरी, भर रस्त्यात रिक्षाचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ-मारहाण, इतका माज येतो कुठून?

अकरावीच्या सीईटीचा नवा पेच, नोंदणी संपल्यानंतर सीबीएसईचा निकाल, विद्यार्थ्यांची मुदतवाढ देण्याची मागणी

(Aurangabad Municipal Corporation will execute door to door corona vaccination campaign to vaccinate citizens)