औरंगाबाद: औरंगाबादेत हत्या (Aurangabad Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हत्येची घटना उघडकीस आल्यानं औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. मुलानंच वडिलांची हत्या (Son killed his father on Gudi Padawa) केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडील दारु पिऊन घरी आल्यामुळे संतापलेल्या मुलानं लोखंडी दांड्यानं आपल्याच वडिलांवर प्रहार केला. यात वडिलांचा जीव गेला असून हत्या करणारा आरोपी मुलाचा सध्या शोध सुरु असल्याची माहिती मिळतेय. गुढीपाडव्याच्या दिवशी वडिलांनी दारु प्यायलानं मुलानं हे कृत्य केल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी पोलिसांनी (Aurangabad Police) गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
औरंगाबाद तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. कडुबा रामभाऊ घुगे असं त्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नानासाहेब कडुबा घुगे असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे. आपल्याच वडिलांची मुलानं हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नानासाहेब घुगे यानं जन्मदात्याची हत्या केल्यानं परिसर हादरुन गेला आहे.
सणाच्या दिवशी कडुबा घुगे हे घरात दारु पिऊन आल्यानं नानासाहेब यास संताप अनावर झाला. रागाच्या भरात नानासाहेब यानं लोखंडी घनानं आपल्या वडिलांच्या डोक्यात प्रहार केला. हा प्रहार इतका जोरदार होता, की यातच कडुबा घुगे यांचा जीव गेला.
या धक्कादायक घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, वडिलांचा जीव घेणाऱ्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. सध्या पोलिस संशयित आरोपी असलेल्या मुलाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी पथकं रवाना करण्यात आली आहे.
पुण्याचा बिहार व्हायला सुरुवात, पुण्यात गुंडाचा हैदोस, दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओचा वापर
भोर तालुक्यात नदीपात्रात आढळले चंदनाचे ओंडके, पोलिसांकडून भोरच्या पुष्पाचा शोध सुरू
मुंबईतील तरुणाचा इगतपुरीतील उंटदरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न