संभाजीनगर : मागील दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राडा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरूनच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरच्या राड्यानंतर राज्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. झालेल्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचं काम राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केले असल्याची टीका त्यांनी केली आहे.
त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
संभाजीनगरमध्ये झालेले प्रकरणाला भाजप आणि शिवसेनेने याला वेगळे वळण लावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
संभाजीनगर प्रकरणाचा प्रामणिकपणे चौकशी करणे गरजेचे आहे कारण या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचं कामही सत्ताधारीवर्गाकडून केले जात आहे.
निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असली तरी वैयक्तिकरित्या या प्रकरणात कोणालाही टार्गेट करत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
या प्रकरणात वैयक्तिकरित्या कोणावरही टार्गेट मी करत नसलो तरी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले आहे.
तसेच त्यांनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरूनही सत्ताधारी आणि मविआवर टीका केली आहे. मविआच्या सभेला परवानगी देण्यात आली असली तरी भाजपा- शिवसेनेच्या यात्रेला परवानगी का दिली जाते आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
यावरून भाजप आणि शिवसेनेला घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
संभाजीनगरमध्ये राडा झाल्यानंतर भाजपचे आणि शिवसेनेचे मंत्री क्रिमिनल गँगस्टरसारखे मंत्री शहरामध्ये वागत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.