औरंगाबादः राज्याचे महसूल राज्यमंत्री अद्बुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोड विधानसभा मतदार (Sillod MLA) संघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली. या निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) नाम निर्देशन पत्र दाखल करताना मालमत्ता खरेदीसंदर्भात शपथपत्रात खोटी माहिती सादर केली, असा आरोप करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी अर्ज दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ही यांनी हा आरोप केला असून या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांनी 2019 साली शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी भरलेल्या शपथपत्रातील मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता यांची खोटी व दिशाभूल करणारी माहिती नमूद केली आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
सिल्ल्लोडमधील महेश शंकरपेल्ली हे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तारांवर हे आरोप केले आहेत. डॉ. अभिषेक हरिदास यांनी 2019 मध्ये सिल्लोड मतदार संघातून निवडणूक लढवली होती. ते माहिती अधिकार कार्यकर्तेही आहेत. या दोघांनी अब्दुल सत्तारांनी नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सिल्लोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी धनराज यांनी सिल्लोड पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच आदेश दिले आहेत.
– अब्दुल सत्तारा यांनी दोन्ही निवडणुकीत शेतजमिनीच्या तपशीलात दिलेल्या माहितीत तफावत आढळून येते, असा आरोप करण्यात आला आहे.
– प्रतिज्ञापत्रानुसार दहिगाव सर्व्हे नंबर 31, 131, 35, 39, 29 ही शेजतमीन त्यांनी 2 लाख 76 हजार 250 रुपयांत खरेदी केल्याचे दाखवले. तर 2014 मधील प्रतिज्ञापत्रानुसार, हीच जमीन त्यांनी 5 लाख 6 हजार रुपयांत खरेदी केल्याचे दाखवले आहे, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
– उमेदवाराला त्यांचा व अवलंबित व्यक्तींच्या तसेच पत्नीच्या वाणिज्य इमारतीचा तपशील द्यावा लागतो. मात्र सत्तार यांनी दोन्ही निवडणुकींमध्ये नामनिर्देशनपत्रांत वाणिज्य इमारतींच्या तपशीलात वेगवेगळी माहिती भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
– सत्तार यांनी खरेदी केलेल्या काही इमारतींच्या किंमतीतही तफावत असल्याचे डिटेल्स याचिकाकर्त्यांनी दिले आहेत.
– तसेच अब्दुल सत्तार यांनी आपली शैक्षणिक माहितीही लपवल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आता पोलीस चौकशीनंतरच्या अहवालात काय समोर येते याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
आमदार अब्दुल सत्तार यांनी 2019 साली शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी भरलेल्या शपथपत्रातील मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता यांची खोटी व दिशाभूल करणारी माहिती नमूद केली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. 27 ऑक्टोबर 20121 रोजी सिल्लोड न्यायालयात यासंबंधी संयुक्त याचिका दाखल केली होती. अब्दुल सत्तार यांनी फसवणुक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने यासंदर्भात पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत.
इतर बातम्या-