औरंगाबादः पैठणमधील ऐतिहासिक नाथषष्ठी (Nath shashthi) उत्सावाला प्रारंभ झाला येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लाखो भाविक पैठणच्या दिशेने निघाले आहेत. पंढरपूरमधील आषाढी यात्रेनंतर महाराष्ट्रातील ही दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाते. दरवर्षी जवळपास 600 दिंडी दाखल होतात. यातील अनेक दिंड्या पैठणच्या (Paithan Dindi) दिशेने निघाल्यादेखील आहेत. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह कोविड लस (Covid Vaccination) घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडी प्रमुख आणि भाविकांना केली आहे. त्याचबरोबर शासनाने सांगितलेल्या कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नाथ षष्ठी सोहळ्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही चव्हाण म्हणाले. कोविड संकटामुळे मागील दोन वर्षांपासून पैठणमधील नाथषष्ठीचा उत्सव पार पडला नव्हता. मात्र यंदा कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा उत्सव भरवण्यास परवानगी दिली असून कोरोनाची नियमावली तंतोतंत पाळण्याचे आदेश स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना दिले आहेत. या सूचना पुढील प्रमाणे-
नाथ षष्ठी सोहळ्यासाठी जवळपास 600 दिंडी दाखल होतात. दिंडी प्रमुखांनी दिंडीतील सदस्यांसह कोविड लस घेणे आवश्यक. तसा लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे अशी विनंती
– जिल्हाधिकारी @DMAurangabadMH
नाथ षष्ठीबाबतचा व्हिडिओ pic.twitter.com/85Mp2qFjVS— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) March 20, 2022
इतर बातम्या-