औरंगाबादः जिल्ह्यातील (Aurangabad District) 0 ते 5 वयोगटातील मुलांसाठी उद्या रविवारी 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरण (Polio Vaccination) मोहीम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील एकूण 3 लाख 186 मुलांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मुलांना लस देण्यासाठी गाव, वाडी, वस्ती, तांडे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, टोलनाके आदी ठिकाणी डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील (Health Department ) जवळपास एकूण 5 लाख 31 हजार 342 बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या 26 लाख 45 हजारांच्या आसपास आहे. तर शहरातील लोकसंख्या 2 जार लाख 61 हजारांच्या आसपास आहे. महापालिकअंतर्गत लोकसंख्या 13 लाख 94 हजारांच्या आसपास आहे. एकूण जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 44 लाख 01 हजार 336 एवढी आहे. यातील लाभार्थी संख्या म्हणून ग्रामीण भागात 3 लाख 186, शहरी भागात 32 हजार तर मनपा हद्दीतील 1 लाख 98 हजार 614 अशा एकूण 5 लाख 31 हजार 342 बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी 2 हजार 994 बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. यात ग्रामीण 2 हजार 195 , शहरी भागात 124 तर महापालिका क्षेत्रात 675 बूथ असतील. यासाठी पुरेशा प्रमाणात लसींचे डोस व मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहेत. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था, विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. नागरिकांनी आपल्या बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर पोलिओ डोस पाजावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेखा भंडारे यांनी केले आहे.
इतर बातम्या-