औरंगाबादः कोरोनाच्या संकटामुळे (Corona Pandemic) त्रस्त असलेल्या सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय औरंगाबाद महापालिका प्रशासानाने घेतला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा मालमत्ता कर (Property Tax) एक रुपयानेही न वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालमत्ता करात वाढ होणार किंवा नाही, याचे घोषणापत्र महापालिकेला द्यावे लागते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने हा निर्णय कळवण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महापालिकेच्या वतीने वाढील मालमत्ता कराबाबत घोषणा होणे अपेक्षित असते. त्यानुसार, ही करवाढ यंदा होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. 2013 पासून मनपा प्रशासनाने मालमत्ता करात एक रुपयाही वाढ केलेली नाही. दरवर्षी प्रशासनाकडून 25 टक्के दरवाढ सूचवण्यात येते. सत्ताधारी हा प्रस्ताव फेटाळून लावत असत. मागील दोन वर्षांपासून महापालिकेवर सत्ताधारी नाहीत. प्रशासकांच्या हाती महापालिकेचा कारभार आहे. मात्र कोरोनामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दरवाढ केली नव्हती. मात्र 2022-23 या वर्षासाठी 25 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव करमूल्य निर्धारण अधिकारी अपर्णा थेटे यांच्याकडून सादर करण्यात आला होता. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या वर्षी दरवाढ करू नये, अशी सूचना केली.
– अ प्रवर्गात स्लॅबचे घर असेल तर 11 रुपये चौरस फूट दर निश्चित करण्यात आला आहे. 500 चौरस फुटाला 3 हजार 228 रुपये मालमत्ता कर भरावा लागतो.
– ब प्रवर्गात गोलपटावचे घर असेल तर 10 रुपये दराने 2 हजार 906 रुपये 500 चौरस फुटाला कर लावण्यात येतो.
– क प्रवर्गात पत्र्याच्या घराला 500 चौरस फुटासाठी 9 रुपये याप्रमाणे 2 हजार 641 रुपये कर लागतो.
निवासी- 2, 26, 714
व्यावसायिक- 24, 447
मिश्र- 5,512
औद्योगिक- 753
शैक्षणिक- 333
शासकीय- 129
एकूण- 2,57,888
इतर बातम्या-