औरंगाबाद | शहरातील कोकणवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी (Aurangabad fighting) झाल्याची घटना घडलीय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) हाती आले असून पंधरा ते वीस जणांमध्ये काही कारणावरून किरकोळ हाणामारी झाल्याचे त्यात दिसतेय. शहरातील कोकणवाडी चौकात (Kokanwadi chauk) ही हाणामारी झाली असून यात सात ते आठ तरूण गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले असून बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे कळतेय. कोकणवाडी परिसरात डीजे लावण्याच्या कारणावरून दोन गट आपापसात भिडले. त्यांतील किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या राड्यात सात ते आठ तरुण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावरील वाहने काही काळ खोळंबली होती. पंधरा ते वीस जणांचा जमावात भर चौकात हाणामारी सुरु होती. काही वेळानंतर हा जमाव रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला गेला. त्यावेळेलाही वाहने थांबली होती. मात्र नंतर यातील काही तरुणांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणांवर उपचार सुरु आहेत. सदर घटनेविषयी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Aurangabad शहरातल्या Kokanwadi मध्ये दोन गटात तुफान हाणामारीhttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/bZBeF5bwAZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2022
औरंगाबाद आणि परिसरात मागील काही वर्षांमध्ये गुन्हेगारी आणि गुंडगिरीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून कुणाचे डोके फोडले, कुऱ्हाडीने वार केले, चाकूने भोसकले अशा घटना सर्रास घडत आहेत. शहरातील काही भागांमध्ये तर गुंडांच्या टोळ्या सक्रिय असून तेथील नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणे सुरक्षित वाटत नाही. पुंडलिक नगर भागातील गुंडांची अशीच दहशत काही दिवसांपूर्वी माध्यमांमधून उघड झाली होती. त्यानंतर परिसरातील नगरसेवकांनी आंदोलन करून पोलिसांना येथील कॉलन्यांमध्ये गस्त घालायला लावली. येथील कॉलन्यांमधील टवाळखोरांचे नशेबाजीसाठीचे अड्डेही पोलिसांनी शोधून काढले होते. शहरातील वाढलेल्या गुंडगिरीचे कारण नशेखोरी असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. गल्ली-गल्लीत नशा करण्यासाठी गोळ्या उपलब्ध आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांतर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याला कितपत यश येतंय, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
इतर बातम्या-