औरंगाबादः शहरातील मध्यवर्ती क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांचा (Shivaji Maharaj Statue) अश्वारूढ पुतळा हा सध्या औरंगाबादकरांसाठी (Aurangabad city) मोठा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. देशातील सर्वोच्च असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा असेल. मागील तीन वर्षांपासून शिवप्रेमी या प्रेरणादायी, भव्य मूर्तीची वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा आता संपली असून शिवरायांचा (New statue) नवा पुतळा क्रांती चौकातील भव्य चबुतऱ्यावर बसवण्यात आला आहे. लवकरच याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. येत्या 18 किंवा 19 फेब्रुवारी रोजी या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल. तत्पूर्वी लोकार्पण केल्यानंतर हा पुतळा कसा दिसेल, याची छायाचित्र पाहता येतील.
मराठवाड्याचे वैभव असलेल्या देवगिरी किल्ल्याची प्रेरणा घेऊन क्रांती चौक येथे या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. 56 फूट उंच आणि 24 मीटर रुंद अशा या भव्य दिव्य स्मारकाच्या आजूबाजूला देवगिरी किल्ल्यासारखे खंदक, अभेद्य भिंत, बालेकिल्ल्याची प्रतिकृती दिसेल. सर्वात वर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 फूट भव्य पुतळा विराजमान आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण होणार आहे. उद्घाटनासाठी शिवजयंतीचा मुहूर्त साधता येईल, असा शिवभक्तांचा आग्रह आहे.
शहरातील आर्किटेक्ट धीरज देशमुख यांनी या शिवस्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम पाहिले आहे. याद्वारे स्वराज्याची भव्यता आणि शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वराज्य साकारण्यात महत्त्वाची बजावणारे पाच फुट उंचीचे 24 मावळे या देखाव्यात असून 24 कमानीही आहेत. तसेच हत्तीच्या मुखातून 24 तास पाणी पडत राहील. शिवाजी महाराजांचा मुख्य पुतळा पुण्यातील मूर्तीकार दीपक थोपटे यांनी साकारला आहे.
इतर बातम्या-