त्याच्या मनात काय होतं, कुणालाच थांग नाही, आठवीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या, औरंगाबादमध्ये खळबळ!

| Updated on: Mar 12, 2022 | 2:13 PM

दरम्यान, आठवीत शिकणाऱ्या या मुलाने आत्महत्या का केली असावी, याचा अंदाज पोलिसांना लागत नाहीये. कुटुंबियांशी चौकशी केली असता, तसे कोणतेही ठोस कारण सांगता आले नाही.

त्याच्या मनात काय होतं, कुणालाच थांग नाही, आठवीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या, औरंगाबादमध्ये खळबळ!
सांकेतिक छायाचित्र
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

औरंगाबादः खेळण्या-बागडण्याच्या वयात एका मुलाने आत्महत्या (Boy Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad city) घडलीय. शहरातील शिवाजी नगर भागात गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडली. इथल्या 14 वर्षीय मुलाने आई आणि बाबा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आत्महत्या केली. घरातल्या पंख्यालाच ओढणीच्या मदतीने गळफास घेतला. घरातून काहीतरी आवाज येतोय, हे ऐकून शेजारी धावले. मात्र तोपर्यंत या मुलाचा प्राण गेला होता. एवढ्या लहान मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून परिसरातील सर्वांचाच थरकाप उडाला.  आठवीत शिकणाऱ्या या मुलाने आत्महत्या का केली असावी, याचा अंदाज पोलिसांना (Aurangabad police) लागत नाहीये. कुटुंबियांशी चौकशी केली असता, तसे कोणतेही ठोस कारण सांगता आले नाही.

कुठे घडली घटना?

औरंगाबादमध्ये गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. येथील शिवाजी नगर परिसरातील रेणूका नगरातील हा प्रसंग आहे. जवळच्याच एका शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलाची आई खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कामाला आहे. तर वडील रिक्षा चालवतात. गुरुवारी सायंकाळी आई-वडील कामानिमित्त बाहेर असताना सदर आठवीतील मुलगा आणि त्याचा लहान भाऊ हे दोघेच घरात होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लहान भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तेव्हाच मोठ्या भावाने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

लहान भाऊ खेळून घरी आला अन्….

दरम्यान, संध्याकाळी अंधार पडल्यावर लहान भाऊ खेळून घरी आल्यावर त्याने मोठ्या भावाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्याने आरडाओरड सुरु केली. त्याच्या किंकाळ्या ऐकून शेजारचे लोक धावत आले. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ पुंडलिक नगर पोलीसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सदर मुलाला फासावरून खाली उतरवले. रुग्णवाहिकेच्या मदतीने घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

दरम्यान, आठवीत शिकणाऱ्या या मुलाने आत्महत्या का केली असावी, याचा अंदाज पोलिसांना लागत नाहीये. कुटुंबियांशी चौकशी केली असता, तसे कोणतेही ठोस कारण सांगता आले नाही. आत्महत्या केलेला मुलगा आठवीत असल्यानं हा वयात येण्याचा टप्पा आहे. या काळात मुलांना अनेकदा नैराश्य येतं. त्यांची वैफल्यग्रस्तता पालकांच्या लक्षात आली नसेल, असा अंदाज मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय. लवकरच यासंदर्भातील ठोस कारण पोलीस तपासात पुढे येईल.

इतर बातम्या-

पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार कारण…- देवेंद्र फडणवीस

Video – Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं