औरंगाबाद | शहर आणि परिसरात वाढलेल्या गुंडगिरीचा आणखी एक दाखला समोर आला आहे. औरंगाबादमधील वाळूज परिसरात (Waluj Area) दुर्लभ कश्यप गँगने (Durlabh Kashyap Gang) दिवसाढवळ्या धुमाकूळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. वाळूजमध्ये भर रस्त्यात काही गुंडांनी चार ते पाच जणांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि गुंडांनी नागरिकांना मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र अद्याप या गुंडांवर काही कारवाई झाल्याची माहिती मिळालेली नाही. औरंगाबादमधील पुंडलिक नगर भागातही या गँगच्या गुंडांनी काही दिवसांपूर्वी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती.
वाळूज परिसरात दुर्लभ कश्यप गँगच्या गुंडांनी भर रस्त्यात ही मारहाण सुरु केली. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांचाही थरकाप उडाला. काहींनी या मारहाणीचे व्हिडिओ तयार केले. ते सोशल मीडियावर टाकले. वाळूज परिसरातील सध्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर रस्त्यात लोकांना मारहाण करण्याची हिंमत करणाऱ्या गुंडांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Aurangabad VIDEO | वाळूजमध्ये दुर्लभ कश्यप गँगचा धुमाकूळ, भर रस्त्यात 4-5 जणांना बेदम मारहाण pic.twitter.com/fFplNdWdCH
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2022
मध्य प्रदेशातील एक कुख्यात गुंड दुर्लभ कश्यप नावाने सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होता. अशाच एका मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. मात्र सोशल मीडियावर अजूनही त्याचे फॉलोअर्स आहेत. औरंगाबाद शहरात या गुंडाचे अनेक फॉलोअर्स आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेखोरीचे प्रमाण वाढले असंख्य तरुण गुंडगिरीच्या आहारी गेले आहेत. सोशल मीडियावरील स्टेटसमध्ये ते सर्रास स्वतःला दुर्लभ कश्यप गँगचे फॉलोअर्स असल्याचे दाखवतात. शहरातील पुंडलिक नगर भागातही काही दिवसांपूर्वी या गँगने एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
इतर बातम्या-