औरंगाबाद | नाशिक, पुण्यासारख्या शहरात रोज पाणीपुरवठा (Water Supply) होऊनदेखील तेथे 1500 रुपये पाणीपट्टी आहे. मग औरंगाबादला (Aurangabad) आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना 4,500 रुपये पाणीपट्टी का, असा सवाल औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) कार्यकर्त्यांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. शहरात दहा दिवसाआड पाणी येते. तेदेखील गढूळ आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचा तर मृत्यूही झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे शुद्ध आणि नियमित पाणी नसेल तर पाणीपट्टीही मिळणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.
प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. मात्र वेळ देऊनही पांडेय हे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी मनपातच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. मनपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासकांनी सदर निवेदन स्वीकारण्याचा निरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. तसेच त्यांनी व्हॉट्सअपद्वारे निवेदन मागवून घेतल्याचेही सांगण्यात आले.
जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र महापालिकेला या पाणीपुरवठा योजनेसाठी वर्षाला तब्बल 140 कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असून पाणीपट्टीपोटी महापालिकेला यंदा केवळ 36 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात 100 कोटींपेक्षा जास्त तोटा आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी योजना अत्यंत जीर्ण झाल्यामुळे महापालिकेचा देखभाल, दुरुस्तीचा खर्च सातत्याने वाढत आहे वीजेचेही कोट्यवधी रुपयांचे बिल भरावे लागते. उत्पन्न् आणि खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासोबत सामान्यांना मुबलक पाण पुरवठा कसा करावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे.
इतर बातम्या-