औरंगाबादः राज्यातील उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) तडाखा विदर्भ आणि मराठवाड्यातील (Marathwada) जिल्ह्यांना जास्त बसतोय. चंद्रपुरात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद झाली आहे तर औरंगाबादचा (Aurangabad) पाराही वाढतच आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज काही ठिकाणी 41 अंश सेल्सियसपर्यंत तापमान नोंदवले गेले तर मराठवाड्यात सर्वाधिक तापमान नांदेड येथे नोंदवले गेले. वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसत असून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात अहमदनगर, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील तीन दिवस या जिल्ह्यांतीन नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणात मात्र या उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार नाही, असं विभागाने सांगितले आहे.
Heatwave warnings have been announced in some districts in Madhya Maharashtra including Ahmednagar, Solapur, Jalgaon, and Marathwada districts including Aurangabad, Hingoli, Parbhani, and Jalna for next 3 days. No heatwave warning in Mumbai for the next 5 days: Jayant Sarkar, IMD pic.twitter.com/ARnTBdBIEZ
— ANI (@ANI) March 30, 2022
मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचं तापमान आज पुढील प्रमाणे नोंदवण्यात आलं.
औरंगाबाद- कमाल 40.2 अंश सेल्सियस
परभणी- कमाल 41.6 अंश सेल्सियस
नांदेड- कमाल 41.6 अंश सेल्सियस
उस्मानाबाद-कमाल 40.2 अंश सेल्सियस
लातूर-कमाल 38 अंश सेल्सियस
हिंगोली- कमाल- 41 अंश सेल्सियस
कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवणार?#maharashtra #temperature #उष्णता #लाट #IMD #warns #heat #wave pic.twitter.com/35Vz6HQ4i7
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2022
मराठवाड्याप्रमाणेच विदर्भालाही उष्णतेच्या लाटेचा फटका बसत आहे. चंद्रपुरातील आजचं तापमान 44 अंश सेल्सियस एवढं नोंदवण्यात आलं आहे. उद्या हे तापमान 45 अंश सेल्सियस पर्यंत जाईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच अकोल्यातील तापमान 43 तर नागपूरमधील तापमान 42 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे.
इतर बातम्या-