औरंगाबादः शहरात गुन्हेगारी (Crime Rate) आणि गुंडगिरी वृत्ती वाढीस लागली असून वारंवार मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. काल मध्यरात्रीदेखील अशीच एक घटना घडली. एका तरुणाशी काही कारणांवरून वाद झाले. या वादाचं रुपांतर भांडणात झालं आणि पाच ते सहा जणांच्या समुहाने तरुणाला बेदम मारायला (Youth beaten) सुरुवात केली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला आणि शरीराला इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यातच त्याचा मृत्यू (Young man died) झाला. आणखी गंभीर म्हणजे, काही तरुण मारहाण करत असताना इतर तरुणांनी याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ सध्या शहरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सदर घटना बुधवारी मध्यरात्री टीव्ही सेंटर परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील शताब्दी नगर परिसरात तरुणाला मारहाण करण्यात आली. यासंबंधीचा जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यात काही तरुणांच्या हातात लाकडी दांडा आहे. या दांड्याने ते जोरजोरात तरुणाला मारहाण कताना दिसत आहेत. काहीतरी घडले असावे, त्याचे कारण विचारण्यासाठी ही मारहाण सुरु होती, असे व्हिडिओवरून लक्षात येत आहे.
बधुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत मनोज शेषराव आव्हाड या तरुणाला मारहाण करण्यात आली. या जखमांमुळे तो मृत्युमुखी पडला. तरुणांच्या या भांडणाचे नेमके कारण काय होते, हे अद्याप कळले नाही. सदर मयत तरुण हा माजी नगरसेवकाच्या लॉनवर कामाला होता, असेही सांगण्यात येत आहे.
शहरात नशेखोरीचे प्रमाण वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे. दर काही दिवसांनी मारहाण, गुंडगिरी, जीवे मारण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी नशेखोरीच्या कारणांवर उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
इतर बातम्या-