धक्कादायक: गुटखा तोंडात टाकला, ठसका लागला अन् क्षणात होत्याचं नव्हतं… काय घडलं औरंगाबादेत?

| Updated on: Mar 12, 2022 | 9:26 AM

गणेश हा 20 वर्षांपासून राहुल साहुजी यांच्याकडे कामाला होता. गुरुवारी संध्याकाळी तो साहुजी यांच्या घरी टीव्हीची डिश बसवण्याचे काम करत होता. हे काम सुरु असताना त्याने गुटखा खाल्ला आणि जोराचा ठसका लागला.

धक्कादायक: गुटखा तोंडात टाकला, ठसका लागला अन् क्षणात होत्याचं नव्हतं... काय घडलं औरंगाबादेत?
औरंगाबादेतील मयत गणेश जगन्नाथ दास
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबादः शहरात एक धक्कादायक घटना घडली. गुटखा खाताना (Eating Gutkha) अचानक एका तरुणाला श्वासाचा त्रास सुरु झाला. ठसका लागला. खोकला येऊ लागला. तो ज्या ठिकाणी काम करत होता, तेथील लोकांनी तत्काळ मदत केली. तरुणाला वाहनाने तत्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासणी केली, तोपर्यंत तरुणाचे प्राण(Death of young man) गेले होते. काय झालं नेमकं, हे कळण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. पण शहरात घडलेल्या या प्रकारानं अनेकांचे धाबे दणाणले. गुटखा, तंबाखू  (Tobaco)आदी व्यसन करणाऱ्या लोकांनी आत्ताच सावधान व्हावं, हे सांगणारी ही बातमी शहराच्या कानाकोपऱ्यात चर्चेचा विषय ठरली.

कुणाच्या बाबतीत घडला प्रकार?

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या गणेश जगन्नाथ दास या तरुणाला गुरुवारी संध्याकाळी असा त्रास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे वय फक्त 37 वर्षे. गणेश हा 20 वर्षांपासून राहुल साहुजी यांच्याकडे कामाला होता. गुरुवारी संध्याकाळी तो साहुजी यांच्या घरी टीव्हीची डिश बसवण्याचे काम करत होता. हे काम सुरु असताना त्याने गुटखा खाल्ला आणि जोराचा ठसका लागला. या ठसक्यामुळे तो अचानक बेशुद्ध पडला. घरातील लोकांनी गणेशला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं.

शवविच्छेदनानंतर कारण कळलं

डॉक्टरांनी गणेशला तत्काळ तपासलं. मात्र तोपर्यंत त्याचे प्राण गेले होते. गणेश यांना मृत घोषित करण्यात आलं. उस्मानपुरा पोलिसात या मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळण्यासाठी पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी पोलिसांना पोस्टमॉर्टेमचा अहवाल मिळाला. त्यात ठसका लागल्याने सुपारीचे खांड घशात अडकले आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून औरंगाबादमध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

इतर बातम्या-

China Lockdown : चीनमध्ये कोरोनाच्या नव्या केसेसनं भीती, पुण्यापेक्षाही छोट्या शहरात पुन्हा लॉकडाऊन, वाचा काय घडतंय?

‘मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?’, श्वेता तिवारी भडकली