बीडः जिल्ह्यातील केज तालुक्यात मोठ्या हवाला रॅकेटचा (Hawala Racket) पर्दाफाश करण्यात आला. सोमवारी रात्री पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. दुप्त माहितीच्या आधारे केजमधील (Kej City) तीन ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. याठिकाणी लाखो रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, हे आरोपी पैशांचा काळाबाजार करत होते. संबंधित आरोपी आयकर चुकवून (Income Tax) टोकन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरु असून त्यांच्याद्वारे इतर अवैध ठिकाणांची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज शहरात विविध ठिकाणी हवाला रॅकेट सुरु असल्याची दुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी केज शहरातील कबाड गल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स आणि सिद्धीविनायक कॉप्लेक्ससमोरील एका ठिकाणी धाड टाकली. या तिन्ही ठिकाणी मिळून 51 लाख 26 हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे.
शहरात तीन ठिकाणी टाकलेल्या या धाडींमध्ये रोख 51 लाखांसह पैसे मोजण्याचं यंत्र, मोबाइल आणि इतर साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन व्यवस्थापकांना अटक केली आहे. मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतिलाल पटेल आणि सुरज पांडुरंग घाडगे असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे. संबंधित आरोपी आयकर चुकवून टोकन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर बातम्या-