बीडः गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाटा इथं रविवारी झालेल्या अपघातात (Beed accident) महसूल अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच अपघात झाला. तर बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके जखमी झाले. रविवारी पहाटेच्या सुमारास राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाटा इथं हा अपघात झाला. अवैध वाळू उपसा (Illegal sand extraction) करून येणाऱ्या एका टिप्परचा पाठलाग करताना हायवा चालकाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी कार भरधाव वेगात (Car accident) होती, मात्र ऐनवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार झाडावर आदळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, महसूल विभागाचे पथक अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात गोदापात्रात कारवाईसाठी गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई सुरु होती. यावेळी गेवराई तालुक्यातील सावळेश्वर फाटा परिसरात अवैध वाळू उपसा करून राक्षसभुवन येथून येणाऱ्या एका टिप्परचा पाठलाग सुरु होता. मात्र रस्त्यावरील एका हायवा चालकाने हुलकावणी दिल्याने पथकाचे कारवरील नियंत्रण सुटले. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार एका झाडावर आदळली. या अपघातात मंडळ अधिकाकरी तथा महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव नितीन जाधव यांचा मृत्यू झाला. तर बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके या अपघातात गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या अपघातात बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सुरुवातीला जिल्हा प्राथमिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे हलवण्यात आले. राक्षसभुवन ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता चांगल्या दर्जाचा असून हा भीषण अपघात सावळेश्वरच्या जवळपास झाला आहे. अपघात झाला तेव्हा कार भरधाव वेगात असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इतर बातम्या-