बीडः बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा (Sugarcane Workers) जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता याच जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची मुलं अधिकारी होताना दिसून येत आहेत. परळी तालुक्यातील कावळेचीवाडी या गावात राहणाऱ्या कृष्णा गोविंदा कावळे (Krushna Govinda Kawale) या मुलाची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. कृष्णा यांचे आई-वडील हे ऊसतोड मजूर आहेत. आणि याच ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. खाजगी कंपनी काम करत असताना अभ्यास करून त्याने अखेर हे यश संपादन केलंय. विशेष म्हणजे कावळेचीवाडी गावातील कृष्णा हा पहिला अधिकारी बनलाय. त्यामुळे अवघ्या गावात त्याचं कौतुक होतंय. गावातील लोकांनी कृष्णा कावळे यांचे गावात जंगी स्वागत करून गावातीलच एक हक्काचा व्यक्ती अधिकारी झाल्याने ग्रामस्थ देखील आनंदी आहेत.
कृष्णाच्या घरी केवळ चार एकर शेतजमीन… आई-वडील, भाऊ, बहीण असा कृष्णाचा परिवार… आई वडील मजुरी आणि ऊसतोडी करून आपला उदरनिर्वाह भागवतात, याच परिस्थितीत आई-वडिलांच्या सोबत दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून आणि खाजगी कंपनी मध्ये काम करून करून कृष्णाने आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचा सामना करून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने घामाचे मोती करून यश मिळवल्याने त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले.
@psi_Krishna_kawale यांचा सत्कार करताना ना @dhananjay_munde साहेब.#बीड#परळी pic.twitter.com/sgM6eN8VsR
— Uttareshwar Khadke (@UttareshwarKha6) March 13, 2022
कावळेचीवाडी गावातील कृष्णा हा पहिला अधिकारी झालाय. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी कृष्णा कावळे यांचे गावात जंगी स्वागत करून गावातीलच एक हक्काचा व्यक्ती अधिकारी झाल्याने ग्रामस्थ देखील आनंदी आहेत. कृष्णा कावळे याची दोन वेळा या पदापर्यंतची संधी हुकली, मात्र त्याने माघार घेतली नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातलीच त्याचा हा प्रवास ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हा प्रेरणादायी ठरत आहे.
इतर बातम्या-