परळी: बीडसह मराठवाड्यात पावसाचा हाहा:कार वाढला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पूरस्थितीची पाहणी केली. त्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.
पूर परिस्थितीची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्याकडेला पाहणी करतायेत. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.
जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल. मराठावाड्याला न्याय देण्यासाठी जयंत पाटील पावले उचलतील अशी मला अपेक्षा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने ते काल बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच मतदारसंघांचा आढावाही घेतला.
दरम्यान, जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यात जलसंपदा विभागाची बैठक घेतली. बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते
जलसिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढ गरजेचे आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांचे उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने मराठवाड्यात ज्याठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील, असे त्यांनी सांगितले.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 September 2021 https://t.co/TRbOrEU9Kh #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
संबंधित बातम्या:
(bjp leader pankaja munde taunt jayant patil’s beed tour)