औरंगाबाद : इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचादेखील या आंदोलनात समावेश होता. मात्र त्यांना वगळून इतर 25 ते 30 कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जुलै रोजी सायकल रॅलीच्या स्वरुपात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. (case has been files against Congress activists who protested in Aurangabad on petrol and diesel price hike Amit Deshmukh has excluded from them)
देशात पेट्रोल तसेच डिझलेचे भाव गगनाला भिडले आहेत. नागरिकांमध्ये याबाबत रोष निर्माण झालेला पाहायला मिळतेय. हाच मुद्दा घेऊन महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. औरंगाबादेतदेखील वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत 16 जुलै रोजी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. मात्र, आता हे आंदोलन परवानगी नसताना आयोजित केले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री अमित देशमुख आणि वरिष्ठ नेते यांना वगळून बाकीच्या कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधून नेते, पुढारी मात्र, सुरक्षित आहेत.
पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ 16 जुलै रोजी औरंगाबाद येथ काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल रॅलीच्या स्वरुपात आंदोलन करण्यात आले. या सायकल रॅलीला काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी उपस्थिती लावली होती. औरंगाबाद शहरातल्या शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सायकल रॅलीचा समारोप केला होता. केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचा या सायकल रॅलीच्या माध्यमातून निषेध करण्यात आला होता.
इतर बातम्या :
औरंगाबादेत एकाच दिवशी दोन मृत्यू ! एकाचा ट्रेकिंगदरम्यान तर दुसरऱ्याचा डोहात बुडून शेवट
मोदींची सर्वपक्षीय बैठकीला फक्त तीन मिनिटांची हजेरी; विरोधक संतापले
(case has been files against Congress activists who protested in Aurangabad on petrol and diesel price hike Amit Deshmukh has excluded from them)