औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.