औरंगाबाद : औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी आज (13 ऑगस्ट) तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी बीडलादेखील अशाच प्रकारे गर्दी झाली होती. कार्यक्रमात गर्दी झाली तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे सरदेसाई यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. (corona rules violated in aurangabad yuvasena sanvad yatra will police file case)
शिवसेनेतर्फे युवा संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जातोय. या संवादाची पुण्यातून सुरुवात झाली. आता मराठवाड्यातसुद्धा अशाच पद्धतीने युवा संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावेळी औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.
कार्यक्रमात गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला तरी आमची हरकत नसेल, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले होते. तसेच कार्यक्रमात कोणतीही गर्दी होऊ देणार नाही अशी हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच येथे कोरोना नियमांचे लल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व प्रकारानंतर आता पोलीस प्रशासन कायद्याप्रमाणे कारवाई करणार का ? असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवा संवाद मेळावा पार पडला. यावेळी बोलताना वरून सरदेसाई यांनी मराठवाड्यात युवा सेनेची ताकत वाढत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर कोविड काळात विरोधी पक्षांनी अनेक अडचणी निर्माण करण्याचं काम केलं. मात्र उध्दव ठाकरे यांनी हिंमत न हारता कोरोनाकाळात चांगलं काम केलं. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राहिला, असे सरदेसाई म्हणाले.
इतर बातम्या :
पूरग्रस्तांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक, 22 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
तो पत्नीवर भडकला, कपाट उघडलं, रिव्हॉल्व्हर काढली आणि पत्नीवर रोखली, कारण…
(corona rules violated in aurangabad yuvasena sanvad yatra will police file case)